गौळवाडीच्या प्रा.शिक्षिकेची लबाडी उघड

। पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील पाबळ केंद्रामध्ये रा.जि.प.शाळा गौळवाडी येथे या शाळेच्या शिक्षकांनी नॅशनल टीव्हीवर चुकीची माहिती देऊन आपल्यावर अन्याय होतोय, असं चित्र उभ केलं होतं. परंतु उभ केलेलं चित्र थोतांड व खोट असल्याचे समोर आल्यानंतर या शाळेवरील प्रिया जयवंत आसोलकर या शिक्षिका तेव्हापासून पुन्हा शाळेकडे फिरकल्याच नाहीत.त्यानंतर प्रसार माध्यमांनी वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु पेण पंचायत समिती शिक्षण विभागाकडून ती माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. प्रिया आसोलकर या बालसंगोपनेच्या रजेवर आहेत, असेही सांगण्यात आले. परंतु बाल संगोपणाची रजा ही जिल्हा परिषदेकडून दिली जाते. जिल्हा परिषदेला प्रिया आसोलकर यांनी अर्ज केला असल्याचे सांगितले. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी 26 जुलै रोजी जिल्हा परिषदेचे शिक्षण परिषद गाठून प्रिया आसोलकर यांचा रजेचा अर्ज आला आहे का, याबाबत माहिती घेतली असता कोणत्याही प्रकारचा रजेचा अर्ज जिल्हा परिषदेकडे आला नसल्याचे समजले. महत्वाची बाब म्हणजे बालसंगोपनाची रजा हवी असल्यास कमीत कमी आठ दिवस आणि जास्तीत जास्त 16 दिवस अगोदरचा रजेचा अर्ज असणे गरजेचे आहे. परंतू प्रिया आसोलकर या 7 जुलैला रजेवर जातात आणि जिल्हा परिषदेला 3 ऑगस्टला अर्ज जातो.

Exit mobile version