| पेण | प्रतिनिधी |
15 मे रोजी पेण पोलीस ठाण्यात अभिजीत पाटील उर्फ झेब्रा याच्या विरूध्द भा.द.वि.स.कलम 326, 324, 323, 504(34) नुसार गुन्हा दाखल झाला गुन्हा नोंद झाला होता. तेव्हा पासून अटक पूर्व जामीन मिळावा म्हणून जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय या ठिकाणी वेळोवेळी जामीन अर्ज केला. परंतु घडलेला प्रकार एवढा गंभीर होता. त्यामुळे अभिजीत पाटील याला न्यायालयाने जामीन दिला नाही. मात्र, असे असतानाही दोन महिने होउन हा झेब्रा मोकाट फिरत आहे. तसेच याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पेण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती वरून समजते.
अभिजीत पाटील यांचे कुटुंब एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने रायगडातील एक आमदार या अभिजीत पाटील याला वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचे खुद्ददस्तुर अभिजीतची आई सांगत आहे. महत्वाची बाब म्हणजे 15 मे पूर्वी अभिजीतचे कुटुंब शिवसेना ठाकरे गटाबरोबर होते. मात्र, आपल्या मुलाला वाचवण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केल्याचे देखील खात्री लायक वृत्त असून तशा प्रकारचे समाज माध्यमांवर फोटो देखील फिरत आहेत. या प्रकरणात फिर्यादी ॠषिकेश कदम याला एवढे जबरी मारले होते की, चेहरा काळा निळा पडला होता. डोक्याला जबर मारहाण झाली होती. डोळयामध्ये रक्त उतरले होते. डॉक्टरांच्या सर्व टेस्ट पूर्ण झाल्या नंतर ॠषिकेशच्या चेहर्याला फॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले होते. या सर्वांचा विचार करून अभिजीत याचा जामीन फेटाळण्यात आला होता. मात्र, असे असताना देखील आजही अभिजीत मोकाट फिरत असल्याने सर्व सामान्यांचा हा चर्चेचा विषय झाला असून, राजकीय वर्दहस्तामुळे गुन्हेगार घाबरत नाही असेच काहीसे चित्र पेणमध्ये पहायला मिळत आहे.