महाडमध्ये गौरी गणेश नृत्य स्पर्धा

। महाड । प्रतिनीधी ।
कलगी-तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई व सांस्कृतिक कार्य संचलनाय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच खाडीपट्ट्यातील भवानी नडगाव येथे गौरी गणेश नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कलाकार जगवला तर त्याची कला जिवंत राहील अशी स्पष्टोक्ती आयोजक मंडळ कलगी-तुरा समाज उन्नतीचे अध्यक्ष अनंत तांबे यांनी आपल्या भाषणातून दिली.
या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांमधून प्रथम बक्षीस अमर नाच मंडळ करंजखोल 5 हजार रूपये व सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, ढोलकी, द्वितीय भैरवनाथ कला मंडळ तुरेवाडी मंडणगड 3 हजार रूपये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, ढोलकी, तृतीय भैरीभवानी नृत्य कला मंडळ भवानी नडगाव 2 हजार रूपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, उत्तम नृत्य जयबजरंग कलापथक चोचिंदे, उत्तम कवी विजेते पारितोषिक डॉ.सूर्यकांत चव्हाण, उत्कृष्ट ढोलकीपट्टू विजेते पारितोषिक सिद्धेश धाडवे, उत्कृष्ट गायक शाहीर कमलेश शिगवण, शिवाय सहभागी कलापथक संघाना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ढोलकी देऊन सन्मानित केले. तसेच 15 वरिष्ठ शाहीर कलाकारांना मंडळाच्यावतीने सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version