। लखनऊ । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. गंभीरने सोशल मीडियावर ही माहिती दिली. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्यानंतर गंभीरची चाचणी करण्यात आली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे गंभीरने म्हटले आहे. आहेत. गौतम गंभीरने गेल्या काही दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे. मी सौम्य लक्षणांनंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांची चाचणी करून घ्या आणि सुरक्षित रहा, असे गौतम गंभीरने ट्विटमध्ये म्हटले आहे.