सोगाव क्रिकेट स्पर्धेत गावदेवी वायशेत संघ विजयी

अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील सोगांव पुरस्कृत क्लासिक क्रिकेट क्लब सोगांव येथे मापगांवचे ग्रा.पं. वस्सीम कुर यांच्यावतीने टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत वायशेत येथील गावदेवी संघाने विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच राजाभाऊ ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धेचे आयोजक वस्सीम कुर व मुदस्सर कुर उपस्थित होते. दोन दिवस चालणार्‍या स्पर्धेस बाबुशेठ थळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी श्री गावदेवी वायशेत संघ यांना पारितोषिक 33,333 रुपये व आकर्षक चषक देण्यात आले, तर उपविजेता श्री गणेश बहिरोळे संघास पारितोषिक 22,222 रुपये व आकर्षक चषक रायगड जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष श्रध्दा ठाकूर, बाबुशेठ थळे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून ऋतिक माने बहिरोळे याने पटकविले तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राहुल खरात वायशेत यांनी पटकविले .मालिकावीर म्हणून पंकज शिलीमकर वायशेत याने पटकविले. .यावेळी मुशेत येथील वाहन अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वस्सीम कुर यांच्याकडुन आर्थिक मदत देण्यात आली.

Exit mobile version