। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोकण मराठी साहित्य परिषद मुरुड-जंजिरा शाखेची सर्वसाधारण सभा मुरुड शाखाध्यक्ष संजय गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच निवासस्थानी संपन्न झाली. सदर सभा ही स्व. गजानन (भाऊ) बागडे यांच्या हस्तलिखित साहित्यातून त्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात सादर करण्यासाठी काही कविता, लेख तसेच काव्यसंग्रह व कथासंग्रह प्रकाशित करण्यासाठी त्यांच्या अप्रकाशित साहित्यातून निवडक साहित्याचे वर्गीकरण करण्यासाठी आयोजित केली होती.
सभेसाठी कार्याध्यक्ष अरुण बागडे, उपाध्यक्षा उषा खोत, सचिव डॉ.मधुकर वेदपाठक, खजिनदार प्रतिभा जोशी, नयन कर्णिक, नैनिता कर्णिक, वैशाली कासार, सिद्धेश लखमदे उपस्थित होते. नैनिता कर्णिक यांची कविता नक्षत्रांचे देणे या कॅलेंडर मध्ये प्रसिद्ध झाल्याबद्दल सर्व कोमसाप सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. कर्णिक यांनी कॅलेंडरची एक प्रत अध्यक्ष संजय गुंजाळ यांना भेट म्हणून दिली. सभेच्या शेवटी उपाध्यक्षा उषा खोत यांनी उपस्थितांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.