। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहराजवळील मुंबई-गोवा महामार्ग रस्त्याच्या कडेला अन्नपूर्णा हॉटेलसमोर एक ट्रक उभा होता. या ट्रकच्या केबिनमध्ये लोखंडी ग्रीलमध्ये लॉक करून ठेवलेले 25 हजार रुपये किमतीचे होंडा कंपनीचे लाल रंगाचे जनरेटर अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.







