जिओचे पाच दिवस नेटवर्क गुल

। मुरुड । वार्ताहर ।
मुरुड शहरातील जिओ मोबाईल नेटवर्क सलग चार ते पाच दिवस ठप्प पडत असल्याने मुरुड जिओ मोबाईल ग्राहकांचा जीव टांगणीला लावले आहे. मोबाईल फोनचे रिचार्ज दर वाढवूनही मोबाईल कंपन्या ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात असफल झाले आहेत. त्यामुळे ग्राहक मेटाकुटीला आला आहे.
मुरुड शहरात सर्वात जास्त जिओ मोबाईल फोन ग्राहक आहेत. गेल्या महिनाभरापासून नेटवर्क असूनही मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवत आहे. कॉल न लागणे न येणे, इंटरनेट सेवा ठप्प होणे. या अशा गैर सुविधेमुळे जिओ ग्राहक पुरते हैराण झाले आहेत. एकतर मोबाईल कंपनीच्या रिचार्जवर मोठ्या प्रमाणात आकारलेले वाढीव दर तरीही नेटवर्क सुविधा मिळत नाही.
मोबाईल कंपनीच्या असुविधेमुळे ग्राहकांची होत असलेली फसवणूक व लुटमार थांबणार कधी असा सवाल मोबाईल ग्राहकांमधून होत आहे. मोबाईल कंपनी लुटमार करुन ग्राहकांची करत असलेली पिळवणूकीला अंकुश लावणार कोण शासन या कडे लक्ष देईल का? असा सवाल निर्माण झाला आहे.

Exit mobile version