घारापुरीवर लवकरच लखलखाट..

वीजपुरवठा करण्याचे काम युध्दपातळीवर

| मुंबई | प्रतिनिधी |

घारापुरी ऐतिहासिक बेट हे महावितरणच्या पनवेल शहर विभागाच्या पनवेल 1 उपविभागा अंतर्गत येत असून माहे फेब्रुवारी 2018 मध्ये तीन 22 केव्ही सिंगल कोर सब मरीन केबलच्या सहाय्याने 200 केव्हीए रोहीत्राद्वारे घारापुरी बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या गावात विद्युत पुरवठा कार्यान्वित करण्यात आला आहे.

घारापुरी बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या गावात विद्युत पुरवठा करण्यासाठी ठेकेदारामार्फत 33/22 केव्ही टी.एस रहमान या उपकेंद्रातून नाव्हा खाडी ते मोराबंदर समुद्रमार्ग चार स्वतंत्र 22 केव्ही सिंगल कोर सबमरीन केबलचे काम पूर्ण करून तीन रोहित्र कार्यान्वित करून 2019 मध्ये महावितरणकडे हस्तांतरीत करण्यात आले होते.

न्हावा खाडी ते मोराबंदर (समुद्रमार्ग) दरम्यान नादुरुस्त झाला होता. या नादुरुस्त केबला त्वरित वेगळी करून उपलब्ध असलेल्या एक अतिरिक्त 22 केव्ही सिंगल फेज सबमरीन केबलद्वारे सर्व ग्राहकांना 3 फेज विद्युत पुरवठा करण्यात आला. दि.05 जुन रोजी तीन केबल पैकी एक सिंगल कोर सबमरीन केबल नाव्हा खाडी ते मोराबंदर दरम्यान समुद्रामध्ये नादुरुस्त झाल्याने घारापुरी बेटावरील अनुक्रमे राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तीन्ही गावाचा वीजपुरवठा युद्धपातळीवर चालू करण्यात आला. सद्यस्थिती वरील दोन नादुरुस्त सिंगल कोर सबमरीन केबल मधील दोष न्हावाखाडी ते मोरा बंदर दरम्यान समुद्राचा आत असल्याने तसेच पाऊस, समुद्रातील भारती आहोटी व त्यामुले उदभवणारी अपरिहार्य परीस्थितीवर मात करत सदरचे काम प्रगती पथावर चालू आहे, नादुरुस्त सिंगल कोर सबमरीन केबलमधला दोष प्राप्त होताच दोन्ही नादुरुस्त केबल दुरुस्त करण्यात येईल, त्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

Exit mobile version