नगरपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम

। तळा । वार्ताहर ।
नगरपंचायतीने शहरात घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू केली आहे. आर्थिक वर्ष संपत आल्याने 31 मार्च पूर्वी शहरातील नागरिकांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी वेळेत आपला मालमत्ता कर भरावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांकडून प्रभाग निहाय मालमत्ता कर वसुलीचे नियोजन करण्यात आले आहे.

तसेच नागरिकांना कराच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. जे नागरिक वेळेत आपला मालमत्ता कर भरणार नाहीत त्यांची नावे शहरातील नाक्यावर बॅनर लावून प्रसिद्ध केली जातील असेही नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

तळा शहरातील नागरिकांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी दि.31 मार्च पूर्वी जमा करावी.ज्या नागरिकांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी बर्‍याच काळापासून थकीत ठेवली आहे अशा नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे तसेच 31 मार्च पूर्वी आपला कर न भरणार्‍या नागरिकांची नावे फलकावर प्रसिध्द केली जाणार आहेत

-माधुरी मडके
Exit mobile version