घोटावडे कासारवाडी गावाला स्वप्नातील गावाचा दर्जा


| पाली | वार्ताहर |

रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशनच्या वतीने सुधागड तालुक्यातील घोटावडे कासारवाडी हे गाव सलग दुसर्‍या वर्षी स्वप्नातील गाव म्हणून शुक्रवारी (दि.26) घोषित करण्यात आले. घोटावडे कासारवाडी येथे गाव विकास समिती आणि ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन गाव विकास करण्याच्या व आदर्श गाव करण्याच्या हेतूने 2019 पासून प्रयत्न सुरू केले. पूर्वीची गावाची परिस्थिती खूप दैनिय होती, परंतु, स्वदेस फाऊंडेशन मार्फत झालेली पाणी योजना, शौचालय, शाळेसाठी शौचालय, शाळेसाठी सोलर लाईट, ग्रंथालय, सोलर पथदिवे, मुलांसाठी संगणक, प्राथमिक उपचार पेटी, तसेच वेगवेगळ्या उत्पन्न वाढीच्या योजना राबविण्यात आल्या. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी शेतात फळबाग लागवड, ठिबक सिंचनच्या माध्यमातून चारा लागवड केली आहे व शेळीपालन, कुकुटपालन, कौशल्य प्रशिक्षणातून गवंडी, महिला बचत गट आज समुदायात सक्षम पणे तयार होऊन कार्यान्वित पणे काम करत आहेत.

स्वप्नातील गाव घडविण्यासाठी गाव विकास समितीचे सर्व सदस्य, बचत गटांमधील महिला,युवक व ग्रामस्थ आणि स्वदेस फाऊंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, संचालक प्रदीप साठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वदेस टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे गाव स्वप्नातील गाव म्हणून प्रमाणित केले. या कार्यक्रमासाठी जसदिप लोने, आनंद मांधने, वैष्णवी भालेकर, तुषार इनामदार, शिवदास वायाळ, श्रीधर कोकरे, मुग्धा सोनावणे, सृष्टी ठाकूर, शबनम बुशरा, जितेंद्र म्हात्रे, प्रवीण पाटील, विनोद पाटील उपस्थित होते.

Exit mobile version