वाचनालयास पुस्तके भेट

| पनवेल | वार्ताहर |

रायगड जिल्हा परिषदेने गौरविलेले आदर्श शिक्षक गजानन गणू खारपाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यांचे कनिष्ठ पुत्र मिलिंद खारपाटील यांनी जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून चौक येथील लोकमान्य टिळक वाचनालयास पुस्तके भेट दिली. हि पुस्तके त्यांनी ग्रंथपाल अभिजित चौधरी यांच्याकडे सुपूर्द केली. त्याच प्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत सेकंडरी स्कूल चिरनेर, के. गो लिमये वाचनालय पनवेल, न्यू इंग्लिश स्कूल पनवेल, वासुदेव बळवन्त फडके हायस्कूल पनवेल, साने गुरुजी वाचनालय नेरे शांतीवन, रयत शिक्षण संस्थेचे वावरले हायस्कूल, तालुका वाचनालय पोलादपूर, गजानन महाराज वाचनालय गिम्हवणे दापोली, साने गुरुजी वाचनालय भापट, म्हसळा, सार्वजनिक माध्यमिक विद्यालय रावे पेण, मातोश्री विद्यामंदिर देवनार, मुंबई,केशवराव खांबेटे वाचनालय म्हसळा, लोकमान्य टिळक वाचनालय चौक, या आणि इतरही काही वाचनालयाना 4 लाख रुपये किंमतीची पुस्तके भेट दिली आहेत.

Exit mobile version