विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, संगणक भेट

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

लायन्स क्लब खालापूर यांच्या माध्यमातून कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा माजगाव येथे शिक्षण घेत असलेल्या 50 विद्यार्थ्यांना चॉकलेट, बिस्कीट खाऊ वाटप करण्यात आले. तसेच, या शाळेत शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना अँपल कंपनीचा संगणक त्याचसमवेत स्कुल बॅग, रजिस्टर, वह्या, पेन्सिल, पेन व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षण घेत असताना शालेय साहित्यांची समस्या जाणवू नये, यासाठी विद्यार्थ्यांना हे साहित्य देण्याचे काम गेली अनेक वर्ष या क्लबच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

यावेळी लायन क्लब अध्यक्ष किशोर पाटील, द्वितीय प्रांतपाल विजय गणांत्रा, डिस्ट्रिक्ट अध्यक्ष हँगर प्रोजेक्ट्अंकन शहा, डिस्ट्रिक्ट अध्यक्ष नागेश देशमाने, एक्स्टेंशन चेअर पर्सन- ज्योती देशमाने, जितेंद्र सकपाळ, हरिभाऊ जाधव, भरत पाटील, सरपंच माजगांव – दिपाली नरेश पाटील, उपसरपंच- अपर्णा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील, शशिकांत पाटील, प्रांजळ जाधव, वैशाली महाब्दि, वंदना महाब्दि, सरिता वाघे, पूनम जाधव आदि उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ पोलीस पाटील रमेश ढवालकर, मारुती ढवालकर, बाजीराव ढवाळकर, रणधीर पाटील सामाजिक कार्यकर्ते शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version