। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 3 पदके जिंकली आहेत. भारताकडून मनू भाकर, स्वप्नील कुशाळे आणि सरबज्योत सिंग यांनी नेमबाजीत कांस्यपदक पटकावले. आताही अनेक भारतीय खेळाडू पदकांच्या शर्यतीत आहेत. या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. यामध्ये, ज्येष्ठ उद्योगपती आणि जेएसडब्लू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी पदक विजेत्यांना एक नवीन अलिशान कार भेट देण्याचे आश्वासन दिले आहे. सज्जन जिंदाल यांनी सोशल मिडीयाच्या एका पोस्टमध्ये जाहीर केले की, ते 2024 पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रत्येक भारतीय पदक विजेत्याला एमजी विंडसर कार भेट देतील. त्यांनी म्हटले आहे की खेळाडू त्यांच्या समर्पण आणि यशासाठी पुरस्कारास पात्र आहेत. त्यांना आलिशान कारची भेट जाहीर करताना खूप आनंद होत आहे.







