। कोलाड । प्रतिनिधी ।
पर्यावरणपूरक ऊर्जेचा प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागात शाश्वत विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने तटकरे चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त संदीप तटकरे यांच्या माध्यमातून श्रीमती गीता. द. तटकरे तंत्रनिकेत कॉलेज यांच्या वतीने गोवे ग्रामपंचायतीला सौर दिव्यांची भेट देण्यात आली. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत परिसरासाठी सौर दिवे व पाईप प्रदान करण्यात आले. सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीज बचत होऊन पर्यावरणाचे संरक्षण होईल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी तटकरे चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त संदीप तटकरे, रजिस्टार अजित तेलंगे, प्राचार्य विपुल मसाल, नानासाहेब धर्माधिकारी कॉलेज प्राचार्य विश्वास देशमुख, तसेच गोवे ग्रामपंचायतीचे उप सरपंच, निशा जवके, माजी सरपंच नरेंद्र पवार, रंजिता जाधव, ग्रामसेवक गोविंद शिद, ग्रामपंचायतमधील अश्विनी पोटफोडे, मयुरी जाधव, अजय पिंपलकर, विनायक पोटफोडे, गोवे ग्रामस्थ उपस्थित होते.
या सौर दिव्यांमुळे गोवे परिसरातील रस्त्यावर रात्रीच्या वेळी सुरक्षितता वाढण्यास मदत होणार असून नागरिकांनाही त्याचा लाभ होणार आहे. तटकरे कॉलेजच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामपंचायतीच्या वतीने कौतुक करण्यात आले.







