शेवटच्या सामन्यात गिल, शार्दुलला विश्रांती

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

शुभमन गिल आणि शार्दुल ठाकूर यांना राजकोट येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, गिल आणि शार्दुल संघासह राजकोटला जाणार नाहीत आणि त्याऐवजी ते थेट गुवाहाटीला जातील, जिथे टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गिलने शतक ठोकले होते. 2023 मधील त्याचे हे 5 वे शतक आहे. या वर्षी गिलने न्यूझीलंडविरुद्ध 2 शतके आणि बांगलादेश, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी 1 शतक झळकावले आहे. या वर्षी त्याने टी-20 मध्येही शतक झळकावले आहे.

2023 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिल पहिल्या क्रमांकावर आहे. या भारतीय फलंदाजाने आतापर्यंत 20 डावांमध्ये 72 च्या सरासरीने 1230 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 105 आहे.

Exit mobile version