सीएट मानांकन पुरस्कारात गीलची बाजी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

मागील 28 वर्षांपासून पार पडणारे सीएट क्रिकेट मानांकन पुरस्कार CEAT यंदाही पार पडले. मधली तीन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे हा पुरस्कार सोहळा होऊ शकला नव्हता, पण यंदा हा पुरस्कार सोहळा मुंबई येथे झाला असून भारतासह जगभरातील वर्षभरात दमदार कामगिरी करणाऱ्या क्रिकेटर्सचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी भारताचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिलने बाजी मारली, त्याने यावेळी सर्वाधिक आणि एकापेक्षा जास्त अवार्ड पटकावले. गिलने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट एकदिवसीय फलंदाज अशा तीन पुरस्कारांना खिशात घातलं. तसंच सूर्यकुमारला टी 20 फलंदाज आणि भुवनेश्वरला टी20 गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार प्राप्त खेळाडू
मदन लाल आणि कर्सन घावरी(जीवनगौरव), सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटर – शुभमन गिल, महिला क्रिकेटर – दीप्ती शर्मा, फलंदाज – शुभमन गिल,गोलंदाज – टीम साऊदी,एकदिवसीय फलंदाज – शुभमन गिल,गोलंदाज – ॲडम झाम्पा,कसोटी फलंदाज- केन विल्यमसन,कसोटी गोलंदाज – प्रभात जयसूर्या, टी20 फलंदाज – सूर्यकुमार यादव,गोलंदाज – भुवनेश्वर कुमार,राष्ट्रीय क्रिकेटर – जलाज सक्सेना
याचदरम्यान गप्पागोष्टीही रंगल्या. भुवनेश्वर कुमार, शेफाली वर्मा आणि गिल यांच्याशी होस्ट मयांतीने गप्पा मारताना शुभमनला क्रिकेटर नसता तर काय झाला असतास असं विचारलं असता त्याने सायन्स फिक्शन फार आवडत असल्याने सायन्टिस्ट व्हायला आवडलं असतं असं म्हणाला.

Exit mobile version