। छत्रपती संभाजीनगर । वृत्तसंस्था ।
जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात ही तरुणी राहत होती. प्रेम करण्यास जबरदस्ती करत सतत त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून तरुणीने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी तरुणाला तात्काळ अटक करावी, अशी मागणी तरुणीच्या कुटुंबियांनी केली, त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. हरसुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी कासिम यासीन पठाण हा ओहर गावातील एका गॅरेजवर काम करत होता. या तरुणाच्या जाचाला कंटाळून 16 वर्षीय मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.18) दुपारी 1 च्या सुमारास प्रकार घडला. पूजा ही अकरावी सायन्समध्ये शिकत होती. शहरात एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये तिने क्लास लावला असल्याने ती शहरातच राहत होती. रक्षाबंधनासाठी ती दोन दिवसांपूर्वी गावाकडे गेली होती. मागील आठ महिन्यांपासून आरोपी कासिम हा प्रेम कर… अशी बळजबरी करुन मुलीला त्रास देत होता. ही बाब तिने तिच्या कुटुंबियांना सांगितली होती. पूजाच्या कुटुंबीयांनी चार ते पाच वेळेस त्याला समजही दिली होती.