| पॅरिस | वृत्तसंस्था |
पॅरिस ऑलिम्पिक 2024 हे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हते. आता विनेश फोगाट पॅरिसहून घरी परतली आहे. भारतात आल्यावर तिचे भव्य स्वागत करण्यात आले. दिल्ली विमानतळापासून ते गावी पोहोचेपर्यंत चाहत्यांनी विनेशला भरभरून प्रेम दिले. गावात पोहोचल्यानंतर तिची प्रकृती खालावली आणि ती अचानक बेशुद्ध झाली. विनेशला तिच्या हरियाणातील बलाली गावात सन्मानित करण्यात आले. विनेशला तिचे समर्थक आणि गावातील खाप पंचायत सदस्यांनी सुवर्णपदक देऊन गौरविले. या कार्यक्रमादरम्यान ती बेशुद्ध पडली.