| पुणे | प्रतिनिधी |
सध्या पुण्यात ठिकाठिकाणी पाऊस सुरू आहे. विद्युत वायरचा शॉक लागून या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली असून मृत महिलेचे वय 40 वर्षे आहे.
मृत्युमुखी पडलेली महिला कोंढवा परिसरात राहायला आली होती. रविवारी दि.19 दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. दरम्यान, पाऊस कमी झाल्यानंतर ही महिला बाहेर पडली होती होती. मात्र या परिसरात अशलेल्या डीपीमधून विद्युत तारा रस्त्यावर साठलेल्या पाण्यात पडल्या होत्या. परिणामी संपूर्ण परिसरात विद्यूत प्रवाह पसरला होता. याची मृत महिलेला कल्पना नव्हती. घराबाहेर आल्यानंतर पाण्यातील तारा महिलेला दिसल्या नाहीत. या तारांचा स्पर्श झाल्यामुळे परिणामी विद्युत तारांच्या झटक्यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला.