रायगड क्राईम! कुराण पठणाच्या नावाखाली मौलानाकडून मुलीवर अत्याचार

कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील बोहरी धर्मियांच्या मशिदीमध्ये कुराण पठण शिक्षण घेण्यासाठी जाणार्‍या अल्पवयीन मुलींवर तेथील मौलानाने शारीरिक अत्याचार केला. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर त्या शिक्षक मौलानावर गुन्हा दाखल झाला आहे. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या आकुर्ले येथे बोहरी समाजाच्या धार्मिकस्थळाचे कार्यालयात मौलाना विद्यार्थ्यांना कुराण पठणाचे शिक्षण देतात.

गेल्या चार महिन्यांपासून शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या अल्पवयीन मुलीवर मौलानाने 12 सप्टेंबर रोजी शारिरिक अत्याचार केला. अन्य मुलींवरही त्याने यापुर्वी अत्याचार केले होते. मौलानाकडून होणारा अत्याचार सहन न झाल्याने मुलीने शिक्षण सोडून घर गाठले. मुलगी लवकर घरी का आली, याबाबत तिच्या आईने विचारणा केली असता मुलीने घडलेला सारा प्रकार आईला सांगितला. ही धक्कादायक बाब ऐकून आईदेखील सुन्न झाली.

त्यानंतर मुलीच्या पालकांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत मौलानाविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कर्जत पोलीस उप अधीक्षक विजय लगारे, कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धोंडे यांनी अधिक तपास करुन लहान मुलींवर शारीरिक छळ आणि अत्याचार करणार्‍या शिक्षक मौलानाला अटक केली.

Exit mobile version