| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
तरुणीचे अनैसर्गिक लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ तयार करत अश्लील व्हिडिओ आपल्या दोन मित्रांना पाठवून याबाबत कोणाला सांगितल्यास व्हिडिओ क्लिप व्हायरल करून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकाराबाबत तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात 376, 376 (2) (एन), 377, 342, 504, 506, 501 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे की, अलिबाग शहरातील आरोपी याचे कॅबिनेट युनेसेक्स हेअर अँड स्पा दुकान आहे. आरोपी आणि पिडीत तरुणची मैत्री होती. त्यामुळे ती आरोपीच्या दुकानात येत असे. आरोपी याने मैत्रीचा गैरवापर करून फिर्यादी याच्यावर जानेवारी 2023 पासून मार्च महिन्यापर्यंत दुकानात, मुंबई वाडिया हॉस्पिटल येथे आरोपीच्या कारमध्ये तसेच घरी अनैसर्गिक व जबरी लैंगिक शोषण करून जबरदस्तीने कोंडून ठेवले. तसेच आरोपी यांनी झालेल्या प्रकाराबाबत व्हिडिओ क्लिपही काढली. आरोपी याने आपल्या मित्राला ही व्हिडिओ पाठविले. तसेच झालेल्या प्रकाराबाबत कोणाला सगीतल्यास फिर्यादी याना ठार मारून व्हिडिओ व्हायरल करून कुटुंबाची बदनामी करेल, अशी धमकी दिली. तर आरोपी यांच्या दोन मित्रांनीही फिर्यादी यास शिवीगाळ केली.
याबाबत फिर्यादी यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराबाबत माहिती देऊन तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार अलिबाग पोलीस ठाण्यात 376, 376 (2) (एन), 377, 342, 504, 506, 501 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम या करीत आहेत.