आजोळात वाट चुकलेली मुलगी पालकांच्या स्वाधीन
अपघातग्रस्त टीमसह पोलिसांची कामगिरी
। खोपोली । संतोषी म्हात्रे ।
काजुवाडी येथे चार वर्षाची अश्विनी आपल्या मामासोबत खेळत असताना कोणाच्याही नकळत चुकली. वरची खोपोली येथून चुकलेला रस्ता शोधत अतानाच लोहाणा समाज हॉल दरम्यान घरकाम करणार्या मीना मोती आठवाल यांना दिसली असता त्यांनी सतर्कता दाखवत इजाज सय्यद यांच्या सहाय्याने सदर मुलीला पोलीस ठाण्यात आणले त्यानंतर आईवाडींचे शोध मोहीम पोलिस आणि अपघातग्रस्त टीमने सुरू केली आणि तासांतच आई आणि मुलीच्या भेट होतांच दोघींच्याही चेहर्यावर हास्य फुलले
रबाळे येथे राहणारी अश्विनी अंकुश ही आजी कलाबाई मोरे (रा.काजूवाडी) सोबत आली होती. आपल्या मामासोबत खेळत असताना काजुवाडीच्या पायथ्याशी असलेल्या वरची खोपोलीत आली असता रस्त्याने चुकलेल्या घरांचा शोध घेत असताना चालत ती लोहाणा समाज हॉल दरम्यान आली.त्यावेळेस घरकाम करणार्या मीना मोती आठवाल यांना दिसली. त्यांनी सतर्कता दाखवत इजाज सय्यद यांच्या सहाय्याने सदर मुलीला पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी सखोल चौकशी करून त्या मुलीचे नातेवाईक शोधण्याकरिता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला पाचारण केले.त्यानंतर गुरूनाथ साठेलकर यांनी चार वर्षाची चिमुकली सापडल्या चा मेसेज सर्व ग्रुपवरती फॉरवर्ड केल्यानंतर तिच्या नातेवाईकांना माहिती मिळाली आणि ते पोलीस स्टेशनमध्ये आले.
पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सचिन घरत यांनी या या प्रकरणी तांत्रिक बाजू सांभाळली.आणि तासांतच आई आणि मुलीची भेट होतांच दोघींच्याही चेहर्यावरील गगनात मावत नसल्याचे दिसले.







