| पनवेल | वार्ताहर |
बसमध्ये चढत असताना एका मुलींची सोन्याची साखळी हिसकावल्याची घटना पनवेल शहरातील बसस्थानक परिसरात घडली आहे. 10 ग्रॅम वजानाची पन्नास हजार रुपये किमतीची ही सोनसाखळी असून, याप्रकरणी सदर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगारवाडी गाव येथे राहणारी 18 वर्षीय मुलगी पनवेल आयटीआयमध्ये फॉर्म भरण्यासाठी आली होती. त्यानंतर पुन्हा घरी मामाच्या गावाला जाण्यासाठी पनवेल बस स्टॅन्डमध्ये खोपीली बसमध्ये ती मुलगी चढत असताना अज्ञाताने १० ग्रॅम वजानाची पन्नास हजार रुपये किमतीची ही सोनसाखळी हिसकावली. काही वेळानंतर साखळी चोरी झाल्याचे कळाले. त्यांनी तत्काळ पनवेल शहर पोलिसांना याची माहिती दिली.







