। जेएनपीटी । वार्ताहर ।
आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला निरोगी ठेवायचे असेल आणि मुला मुलींनी स्वतःचे रक्षण करावयाचे असेल तर कराटे प्रशिक्षणाची नितांत गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद मा सदस्य विनोद म्हात्रे यांनी खोपटे येथे कराटे प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. खोपटा ग्रामपंचायत येथे युनायटेड शोटोकॉन कराटे असोसिएशनच्या माध्यमातून कराटे प्रशिक्षण उद्घाटन सोहळा रविवारी (दि.2) पार पडला. या प्रशिक्षणाचे उद्घाटन खोपटा-बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर, उपसरपंच सुजित म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विनोद म्हात्रे म्हणाले की, कराटेचे प्रशिक्षण जर घेतले तर आपण नेहमी फिट राहू शकतो. मुलामुलींनी कराटेचे प्रशिक्षण आजच्या युगात घेणे खूप गरजेचे आहे.त्यामुळे आपल्या शालेय जीवनात त्याचा खुप फायदा होऊ शकतो. यावेळी युनायटेड शोटोकॉन कराटे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मंदार पणवेलकर, निलेश जाधव, कैलास म्हात्रे, देवेंद्र पाटील, ग्राम पंचायत सदस्य अच्युत ठाकूर, संदेश म्हात्रे, मिनाक्षी म्हात्रे, जागृती घरत, भावना म्हात्रे, राजश्री पाटील, करिश्मा म्हात्रे, देवानंद पाटील, रितेश ठाकूर, स्कुल कमिटी चेअरमन राजेंद्र पाटील, विश्वनाथ ठाकूर, अनुसाय ठाकूर, प्रशिक्षक वैभव पाटील, अजय तांडेल, मच्छिद्र घरत, प्रज्ञा म्हात्रे, प्रगती भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुलींना कराटेच्या प्रशिक्षणाची गरज
