। मुरूड । वार्ताहर ।
ओकिनावा रियु-कियु शितो- रीयु कराटे-डो क्योकिई इंडिया या संस्थेच्या अंतर्गत कराटे प्रशिक्षण घेत असलेल्या 14 विद्यार्थ्यांची त्रिवेंद्रम केरळ येथे होणार्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.केरळचे सेंसाय डॉ. आदित्य अनिल यांनी मुरुड तालुक्यातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर होणार्या कराटेचे स्पर्धेसाठी निवड केली आहे. ही स्पर्धा 21 ऑगस्ट 2022 रोजी त्रिवेंद्रम,केरळ येथे होणारी राष्ट्रीय स्पर्धा आहे. तसेच महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सनी खेडेकर हे करीत आहेत. शिवम धिरेंद्र सिंह, पर्वणी नरेंद्र चोर्घे,जय महेश जामकर, तन्वी उशाप्ती म्हात्रे, अनुज राजेश भोईर, नेहळ अरविंद घोले, स्वरा निशान वीरकुट, आराध्या रुपेश पाटील, पारस विध्याधर घुरुप, आस्था सचिन अपराध, सादान सज्जत आष्टीकर, अवधूत केतन भोसले, सुरज रमेश कोहली, पायल शिवराम राठोड या विद्यार्थ्थांची निवड झाली.