महाराष्ट्राला दीड कोटी जादा डोस द्या!

केंद्र सरकारकडे मागणी
मुंबई | प्रतिनिधी |
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जुलै महिन्यात 1 कोटी 15 लाख लसीचे डोस देण्यात येणार आहेत. मात्र, लसीकरणाची महाराष्ट्राची क्षमता व नियोजन लक्षात घेता राज्याला अधिकचे दीड कोटी डोस देण्याची मागणी आरोग्य विभागाने एका पत्राद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे. लसीकरणात महाराष्ट्र हे देशात सातत्याने प्रथम क्रमांकावर राहिले आहे. आजघडीला तीन कोटी तीस लाखाहून अधिक लोकांचे महाराष्ट्रात लसीकरण झाले असून, 26 जून या एकाच दिवशी राज्यात 7 लाख 38 हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले होते. केंद्र सरकारने अखंडित लस पुरवठा केल्यास राज्यातील लसीकरण नियोजित वेळेत पूर्ण करता येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी 2 जुलै रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांना पत्र लिहून महाराष्ट्राला दीड कोटी जादा लसीचे डोस देण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version