। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये कमालीची घट नोंदवण्यात येत आहे. देशात केवळ 33 हजार 917 सक्रिय कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. तर, 4 कोटी 24 लाख 46 हजार 171 रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दुदैवाने आतापर्यंत 5 लाख 15 हजार 974 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ नोंदवण्यात आली आहे. रविवारी 2 हजार 503 कोरोनाबाधित आढळले होते. तर, 27 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत 180 कोटी 40 लाख 28 हजार 891 कोरोना डोस लावण्यात आले आहेत. यातील 19 लाख 64 हजार 423 डोस सोमवारी दिवसभरात लावण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून देशात आतापर्यंत 2.13 कोटी बूस्टर डोस लावण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या 182 कोटी 84 लाख 94 हजार 230 डोस पैकी 17 कोटी 30 लाख 61 हजार 681 डोस अद्यापही केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांकडे शिल्लक आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 77.97 कोटी कोरोना तपासण्या करण्यात आल्या असून यातील 7 लाख 1 हजार 773 तपासण्या सोमवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.