अन्यथा कोकणवासीय रस्त्यावर उतरतील; मनसेचे वैभव खेडेकर यांचा सरकारला इशारा
| महाड | प्रतिनिधी |
कोकणात जाणार्या प्रवाशांना गेली अठरा वर्षांपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यातूनच प्रवास करावा लगत आहे. त्यातच रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणार्या कशेडी बोगद्या मधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू झाल्याने या बोगद्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने याप्रकरणी ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकार्यांची खातेनिहाय चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी कोकणातील मनसेचे नेते व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केली आहे.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणार्या नातू नगर येथील कशेडी बोगद्याचे काम अद्याप सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी या बोगद्यातील वाहतूक सुरु केली होती. मात्र बोगद्याला ऐन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने पाण्याच्या धारा चालू झाल्या आहेत. याबाबत खेडचे माजी नगराध्यक्ष व मनसेचे कोकणचे नेते वैभव खेडेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कशेडी बोगद्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असे सांगून ज्या पद्धतीने या बोगदात सुरक्षेच्या उपायोजना करावयास पाहिजे होत्या त्या केल्या गेल्या नाहीत, त्यामुळे आज ही परिस्थिती कशेडी बोगदात उद्भवल्याचे वैभव खेडेकर यांनी सांगितले.
कोकणातील जनतेच्या माती निकृष्ट दर्जाच्या महामार्ग केला आहे तसेच, निकृष्ट दर्जाच्या कशेडी बोगद्याचे काम केले आहे त्याऐवजी चांगल्या पद्धतीचा महामार्ग व व चांगल्या पद्धतीच्या बोगद्याचे काम शासनाने ठेकेदारा मार्फत करून घेतले नाही तर कोकणवासीय रस्त्यावर उतरतील, असा इशारा मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी शासनाला व राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अभियंत्यांना दिला आहे.