आ. रमेश पाटील यांची पेट्रोलियमंत्र्यांकडे मागणी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
मच्छिमारांना डिझेल दरात सवलत देण्यात यावी, अशी मागणी कोळी महासंघाचे अध्यक्ष आ. रमेश पाटील यांनी केंद्रीय पेट्रालियमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केली आहे. गुरुवार, 7 एप्रिल रोजी त्यांनी नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी पेट्रोलियममंत्र्यांनी अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला दिले.
कोळी महासंघाचे अध्यक्ष, आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील गोपाल शेट्टी, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सरचिटणीस, किरण कोळी भाजपा प्रदेशाध्यक्ष मच्छिमार सेल, चेतन पाटील या मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने देशातील मच्छिमारांना वाढीव दराने पेट्रोलियम पदार्थ मिळत असल्याबाबतची माहिती पेट्रोलियममंत्र्यांना करुन दिली.
यावेळी उपस्थितीत अधिकारी यांनी गुजरात व महाराष्ट्रात डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कर परत मिळत असल्यामुळे फक्त एक-दोन रुपयांचा फरक राहिला आहे. व इतर सागरी राज्यांचा प्रश्न नाही, अशी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमदार रमेश पाटील व किरण कोळी यांनी आक्षेप घेत सांगितले की, मूल्यवर्धित कर परतावा हा राज्यांचा विषय आहे. आम्ही किरकोळ व घाऊक विक्रेत्या यामध्ये प्रतिलीटर रू. 25 ते 30 रूपये फरक आहे. तो कमी करण्याबाबत आलो आहोत. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री यांच्या कार्यालयात प्रस्ताव दिला आहे. लवकरच मच्छिमारांना पेट्रोलियम पदार्थावरील वाढीव दराबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो असे आश्वासन दिले.





