इतर मागासवर्ग कल्याण समितीकडे मागणी
पाली/बेणसे | प्रतिनिधी |
ओबीसी समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत अॅड. राकेश नारायण पाटील यांनी इतर मागासवर्गीय कल्याण समितीचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांना बुधवारी निवेदन दिले. निवेदन देताना अॅड. कौत्सुभ पुनकर तसेच अॅड. विक्रांत पाटील हजर होते. अॅड. पाटील यांनी दिलेल्या निवेदनात ओबीसी समाजाचे प्रश्न मांडताना म्हटले आहे की, रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यांत यावी. रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण आहे ते लागू करण्यांत यावे. अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या विद्यार्थी, बेदखलकुळे भूमीहीन प्रकल्पग्रस्त यांच्या न्यायहक्कांसाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ओबीसी प्रश्न दिन म्हणून भरविण्यांत यावा जिल्ह्यातील सद्यस्थितीत असणारे जे. एन. पी. टी. सिडको, गेल, आर. सी. एफ., जे. एस. डब्ल्यू, तसेच अन्य प्रकल्प हे ओबीसी समाजातल्या शेतकर्यांच्या त्यागावर उभे असून वरील प्रकल्पांमधील सीएसआर. फंडातील काही भाग येथील इतर मागासवर्ग समाजाच्या शैक्षणिक आरोग्य, सामाजिक खर्चासाठी तरतुद शासन स्तरावर करण्यांत यावी आदी मागण्या करण्यात आललेल्या आहेत. ओबीसी नेते कुळकायदा जनक नारायण नागू पाटील यांचे स्मारक, अलिबाग-चरी या गावी शासनाने बांधून समाजासमोर नवा आदर्श उभा करावा. अशी मागणी करण्यात आली आहे.