अजगराला जीवदान

| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील बलाप गावाजवळील एका राईसमिलमध्ये शुक्रवारी (दि.28) एक नऊ फूट लांबीचा अजगर शिरला होता. हा अजगर येथील बंद मशीनमध्ये दडून बसला होता. तब्बल दीड तास शर्तीचे प्रयत्न करून रात्री उशिरा पालीतील सर्पमित्र दत्तात्रय सावंत यांनी अजगराला पकडले व पाली सुधागड वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप सुरक्षित अधिवासात सोडून दिले. या अजगराला पकडण्यासाठी राईस मिलमध्ये प्रवेश करत असताना गेटवरच एक चापड्या जातीचा निमविषारी साप देखील गेटच्या कडीवर बसला होता. या सापाला देखील सर्पमित्र दत्तात्रय सावंत यांनी यावेळी सुखरूप पकडले. आणि अजगरासोबतच सुरक्षित अधिवासामध्ये सोडून दिले.

Exit mobile version