पंधरा दिवसात वजन दुप्पट
| नेरळ | प्रतिनिधी |
आईच्या दुधाला पारखं झालेल्या एका चार महिन्याच्या बालकावर यशस्वी उपचार करुन त्याचे वजन वाढविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. कर्जत तालुक्यातील डामसेवाडी येथील चार महिन्याच्या बाळाच्या आई डिसेंबर 2022 मध्ये मृत झाल्यानंतर त्या बालकाची अंगावरील दुधापासून आबाळ झाली होती. त्यानंतर त्या कुपोषित बाळाला एकात्मिक बालविकास आणि युनायटेड वे या संस्थेकडून कर्जत उपजिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान,मागील 15 दिवसात त्या कुपोषित बालकाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्या बालकाचे वजन दुप्पट झाले असून ते आता कुपोषणाच्या नॉर्मल स्टेजमध्ये आले आहे.

जगदीश आवाटे यांच्या पत्नी सरिता यांचे निधन झाले. त्याआधी त्यांनी जन्म दिलेल्या बाळाला स्वतःच्या अंगावरील दूध पाजू शकली नाही.त्याचा परिणाम त्या बालकाची शारीरिक वाढ वेळेवर होऊ शकली नाही.त्यामुळे त्या बालकाचे वजन वयानुसार वाढायला हवे होते ते देखील वाढले नाही. कुपोषणाच्या खाईत गेलेल्या त्या बाळाला शोधून उपचार करण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प आणि युनायटेड वें या संस्थेने यांनी त्या बाळाला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोन जानेवारी रोजी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यावेळी त्या बाळाचे वजन हे एक किलो 800 ग्रॅम एवढे होते. एकात्मिक बाळविकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर आणि पर्यवेक्षिका शरयू तांबे यांनी त्या बाळाची जबाबदारी कर्जत उपजिल्हा रुग्णालय यांच्यावर सोडली होती.
बालरोग तज्ञ डॉ मनोज बनसोडे यांनी उपचार सुरु केले.त्यासाठी त्यांनी रुग्णालयातील डायटिशन सचिन धनगर तसेच स्टाफ नर्स सपना गायकवाड आणि रुपाली कांबळे या आरोग्य पथकाच्या जोडीला ताई जगताप आणि सुलभा शेलार या परिचारिका तसेच बाळाचे वजन वाढावे यासाठी औषधे यांच्या जोडीला योग्य आहार देण्यासाठी आचारी रुपाली खंडागळे यांनी देखील आपली जबाबदारी पार पडली आणि त्यामुळे 15 दिवसात त्या कुपोषित बाळाचे वजन दुप्पट झाले आहे.दोन जानेवारी रोजी त्या कुपोषित बालकाचे वजन हे एक किलो 800 ग्रॅम एवढे होते. ते आता दोन किलो 600 ग्रॅम म्हणजे दुप्पट झाले असून ते ब्लॅक देखील अतितीव्र कुपोषित श्रेणीमधून बाहेर आले आहे. त्या कुपोषित बालकाचे वजन वाढले असून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात एनआरसी मध्ये उपचार घेत असल्याने प्रकृती देखील स्थिर झाली आहे. त्यामुळे एकात्मिक बालविकास आणि कुपोषण निर्मूलनासाठी मदत करणारी युनायटेड वे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.