। रेवदंडा । प्रतिनिधी ।
या परीसरात शनिवारी (दि.19) एका वाडीतील विहीरीत एक भेकर प्रजातीचे वन्यजीव पडले असल्याचे निर्सप्रेमी राकेश काठे व त्यांच्या सहकार्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ विहीरीत उतरून त्या भेकराला बाहेर काढले व त्वरित अलिबाग वनविभागाला कळविले. या घटनेची तातडीने दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांनी नागाव वनपरिमंडळाचे वनअधिकारी वनपाल विजय पाटील, नियतक्षेत्र अधिकारी एम.डी तायडे, उदय हटवार, दत्ता कोळेकर, शुभम महाले, निलेश पवार हे घटनास्थळी दाखल झाले. या भेकराची पहाणी केली असता ते एक किशोर वयीन नर प्रजातीचे भेकर असुन त्याच्या मागील पायाला दुखापत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या भेकराला पुढील उपचारासाठी पुणे येथील उपचार केंद्रात पाठविले असून ग्रामस्थ राकेश काठे, अथर्व वसईकर, सार्थक उळे, अथर्व नाईक, विश्वनाथ ठाकूर, अरविंद बुरांडे, ओंकार उळे, मारूती भगत, जयेश वसईकर यांचे उपस्थित वनअधिकारी यांनी आभार मानले.