जखमी कोकिळ पक्षांना जिवनदान

| उरण | वार्ताहर |

जखमी अवस्थेत सापडलेल्या नर आणि मादी कोकिळ पक्षाला पक्षिमित्र रवींद्र फुंडेकर यांनी जीवदान दिले. दोन्ही पक्षांना त्यांनी अधिक उपचारासाठी फ्रेंड ऑफ नेचर संघटनेकडे सुपूर्द केले. सातत्याने पक्षी जखमी होण्याचे प्रमाण वाढत असल्याने पक्षिप्रेमींनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

चिरनेर येथील शेतात दोन कोकिळा अत्यंत गंभीर अवस्थेत पडल्याचे स्थानिक शेतकऱ्यांना दिसून आले. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती पक्षिमित्र पुंडेकर यांना दिली. त्यानंतर पक्षिमित्र पुंडेकर यांनी शेतात जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांना नर आणि मादी असलेले दोन कोकीळ पक्षी जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले. अन्य पक्षांनी हल्ला केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त पुंडेकर यांनी व्यक्त केला. मादी कोकिळेचा पाय तुटला आहे, तर नर कोकिळेच्या दोन्ही पंखांना जखमा झाल्याने त्यालाही उडता येत नाही.

रायगड जिल्ह्यात पक्षांनवर चांगले उपचार करण्याची सोय नाही. पुण्यामध्ये तशी सोय करण्यात आलेली आहे. नर आणि मादी कोकिळेस उपचारासाठी पक्षिमित्र रवींद फुंडेकर यांनी फ्रेंड ऑफ नेचर संघटनेचे पदाधिकारी राजेश पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले असल्याचे सांगितले. पाटील यांनी वन विभागाच्या मदतीने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. समाजामध्ये रविंद्र पुंडेकर यांच्यासह पक्षिप्रेमी असल्याने जखमी पक्षांवर तातडीने उपचार करता येतात आणि त्यांची जीव वाचवता येतो, असे पाटील यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारचे जखमी पक्षी आढळल्यास पक्षिप्रेमी अथवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

Exit mobile version