८ जूनला १२ वी च्या लागलेल्या निकालात संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. इतके दिवस सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली होती. परंतु समोर आलेल्या निकालात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले आहेत.
खांब ज्युनिअर कॉलेजचा 100 टक्के निकाल
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या श्री.रा.ग.पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब व द.ग.तटकरे ज्युनिअर कॉलेजने 12 वी परीक्षेच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत आपला या वर्षीचा निकाल 100 टक्के लावला आहे.
या वर्षीच्या निकालात वैष्णवी संजीवकुमार पारठे 70.33 टक्के गुण संपादित करून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर द्वितीय पूजा सुरेश गोठम 70.00 टक्के, तृतीय प्रतीक्षा पांडुरंग बारस्कर व तनुजा जयवंत जाधव 69.17 टक्के तर दिक्षा जनार्दन गोसावी हिने 65.17 टक्के गुण संपादित करून चतुर्थ क्रमांक पटकावला आहे.
विद्यार्थी वर्गाने मिळविलेल्या या सुयशाबद्दल संस्थापक अध्यक्ष श्री. रा.ग.पोटफोडे (मास्तर), विद्यमान चेअरमन महेंद्र पोटफोडे, उपाध्यक्ष राम कापसे व सर्व संचालक मंडळ, प्रा.सुरेश जंगम व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन व्यक्त करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एस.पी.जैन कनिष्ठ महाविद्यालयाचा 95.60 टक्के निकाल
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील एस.पी.जैन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या परिक्षेचा कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांचा एकुण निकाल 95.60 टक्के लागला आहे. यामध्ये कला शाखेचा निकाल 87.69 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 94.59 टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल 99.39 टक्के लागला असल्याची महिती प्रा.महादेव पाटील यांनी दिली.
बारावीच्या परिक्षेत विज्ञान शाखेतील अक्षता नारायण चोगले ही विद्यार्थीनी 77.67 टक्के गुण मिळवून संपूर्ण कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. अरमिन इरफान मुल्ला 75.50 टक्के व कार्तिक अमरीतलाल परमार 74.33 टक्के यांनी विज्ञान शाखेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.
वाणिज्य शाखेतओम श्रीकांत मिसाळ 73.50 टक्के याने प्रथम क्रमांक तर मानसी रविंद्र कदम 63.83 टक्के व वैभवी द्वारकानाथ भोय 63.67 टक्के यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. याचबरोबर कला शाखेत रुतिक लिंबाजी काष्टे 58.50 टक्के, पुर्वा दिनेश गायकर 55.50 टक्के तरअथर्व विनोद कर्जेकर 54 टक्के हे विद्यार्थी अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
उरण तालुक्याचा 93.02 टक्के निकाल
उरण तालुक्यातील 13 शाळांचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून 93.02 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली.
या 13 शाळांमधुन विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील एकूण एक हजार 968 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते. त्यापैकी एक हजार 827 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीच्या निकालात एन आय हायस्कूल 56.52 टक्के, उरण एज्युकेशन सोसायटी विज्ञान आणि वाणिज्य शाखा 100 टक्के, तुकाराम हरी वाजेकर विज्ञान 100 टक्के, वाणिज्य 99.41 टक्के, कला 76.41 टक्के, छत्रपती शिवाजी हायस्कुल विज्ञान आणि कला दोन्ही शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. कोकण एज्युकेशन कला शाखा 85 टक्के, कर्मवीर भाऊराव पाटील कला आणि वाणिज्य 100 टक्के, सिटीझन हायस्कूल विज्ञान आणि वाणिज्य 100 टक्के, सेंट मेरीज स्कुल विज्ञान आणि वाणिज्य 100 टक्के, रामचंद्र म्हात्रे विद्यालय विज्ञान 78.20, कला 67..64, वाणिज्य 100 टक्के, आर. एन. ठाकूर कला 100 टक्के, रोटरी स्कुल वाणिज्य 100 टक्के, वीर सावरकर विज्ञान 100 टक्के, कला 99.32 टक्के, पी. सी. पाटील वाणिज्य 100 टक्के लागला असल्याची माहिती उरण पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली आहे.
नागोठणे उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मुलींची बाजी
नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा बारावीच्या परिक्षेचा वाणिज्य व कला शाखेचा एकूण निकाल 90 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत खदीजा फैज बुबेरे ही विद्यार्थिनी 79.33 टक्के गुण मिळवून ज्युनिअर कॉलेजमध्ये पहिली आली. तर सीमरा कामीस पटेल 77.67 टक्के व पित्तू सौदा मुदस्सीर 77.50 टक्के यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. तर कला शाखेत फिजापरवीन हारून अन्सारी 68.50 टक्के, सानिया जाविद शेख 55.32 टक्के व नाझीया जमीर खान 53.17 टक्के या अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
नांदगाव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश
भोराई शिक्षण प्रसारक मंडळाचे संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथील इयत्ता बारावी कला शाखेचा शैक्षणिक वर्ष 2021-22 निकाल 95.83 टक्के लागला असून ओमकार रवींद्र उतेकर 73.50 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर रसिका विश्वनाथ जंगम 72.67 टक्के गुण मिळवून द्वितीय तर कामिनी किसन वालेकर 70.33टक्के गुण मिळवून तृतीय स्थानी राहिली. तसेच इतर विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून यश प्राप्त केले. भोराई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश खैरे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांचे अभिनंदन केले.
बी.के.पाटील कॉलेजचा 100 टक्के निकाल
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने एच एस सी (12 वी) चा निकाल जाहीर केला. सदर परीक्षेत बी. के. पाटील ज्युनिअर कॉलेजचा 100 टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी मरियम अन्सारी (82%) हिने जीवशास्त्र विषयात 98 मार्कस घेऊन महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम आली तर सुफिया शेख (79%), सय्यद नम्रा (76%) तसेच कॉमर्स शाखेत निकिता झलके (72%) प्रथम, घोडके आकाश (70%) द्वितीय, जाधव राज (67%) तृतीय तर आर्टस् विद्याशाखेत सुरवसे सरिता (77%) प्रथम, मढवी रोशनी (57%) द्वितीय, बैजंत्री भाग्यश्री (54%) तृतीय तसेच दि इलाईट पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचाही 100 टक्के निकाल लागला. त्यात विज्ञान शाखेतील चौधरी सुंदुस सबा (70%) प्रथम, प्रजापती अनुराग (69%) द्वितीय, मोरे प्राजक्ता (68%) हिने तृतीय क्रमांक पटकावला तर कॉमर्स शाखेत तांबे लायबा (75%) प्रथम, आयशा अल्मास (74%) द्वितीय, ठाकूर स्नेहा (74%) तृतीय आणि आर्टस् विद्याशाखेत महेक दस्तगीर (85%) प्रथम, चीचला त्रिशा (67%) द्वितीय तर जोशी मानसी (67%) हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन बबन पाटील आणि संचालक गणेश पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.