धनश्री ठाकूर हिचा गौरव

| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील चिरनेर मुळपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते के.बी. ठाकूर यांची सुकन्या धनश्री काशिनाथ ठाकूर हिने एम टेकपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून उज्ज्वल कामगिरी केली आहे. तिच्या यशाबद्दल धनश्रीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. महागणपती मित्रमंडळातर्फे तिचा 25 ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गौरव करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे 2009 मध्ये बीटेक इन आयटीमधून तिने डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले अतिशय मेहनत जिद्द चिकाटी व आत्मविश्‍वासाच्या जोरावर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात चार वर्षाकरिता तिला विद्यापीठाकडून लेक्चरर म्हणून घेण्यात आले होते व्याख्याते म्हणून काम करत असताना 2014 मध्ये एमटेक इन कॉम्प्युटर इंजिनिअर ही पदवी तिने संपादन केली दरम्यान यापुढेही तिचा शिकण्याचा मानस आहे तिने मिळवलेल्या यशाबद्दल चिरनेर येथील श्री महागणपती मित्र मंडळातर्फे तिचा गौरव करण्यात आला तर माजी आमदार मनोहर भोईर राजीपाचे सदस्य बाजीराव परदेशी राजीपाचे माजी सदस्य संतोष ठाकूर सभापती शुभांगी पाटील माजी सभापती भास्कर मोकल सरपंच संतोष चिर्लेकर जेष्ठ कार्यकर्ते गोमा ठाकूर कार्यकर्ते विजय पाटील तसेच युवा वर्गाकडून तिचे अभिनंदन करण्यात आले आहे

Exit mobile version