| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील खांब येथील प्रतिष्ठित नागरिक व सेवानिवृत्त अधिकारी म्हणून ओळख असणारे सूर्यकांत विरकर यांचा पुणे येथे विशेष सन्मान करण्यात आला आहे.
पुणे पत्रकार भवन येथे कृतिशील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, उपाध्यक्ष व्यंकटराव गायकवाड, कार्याध्यक्ष मनोहर पोकळे, सरचिटणीस टी.के. गुरव यांच्या हस्ते सूर्यकांत विरकर यांचे सेवाकाळातील कार्य व सेवानिवृत्तीनंतरचे कार्य या कार्याची विशेष दखल घेऊन रायगड जिल्ह्यातील मुख्य प्रवर्तक म्हणून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी रायगड जिल्ह्यातून त्यांच्यासमवेत सेवानिवृत्त शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाड प्रदीप घाणेकर, सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता जलसंधारण विभाग रमेश फेरवाणी, सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता जलसंपदा विभाग शशिकांत माने, सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता जलसंपदा विभाग बालाजी शिर्के, सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता जलसंपदा विभाग प्रशांत पाथरे, डॉ. प्रमोद विरकर, स्नेहा विरकर आदी उपस्थित होते.







