| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील बेलपाडा येथे श्रीकृष्ण वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने, तुकाराम गणा घरत यांच्या निवासस्थानी अखंड हरिनाम सप्ताहात तुकोबाराय गाथा पारायणाचे वाचन सुरू आहे. या सप्ताहात अष्टगंध कला मंचाचे अध्यक्ष अशोक म्हात्रे, गणेश पाटील, रावजी म्हात्रे व माणिक म्हात्रे यांनी अन्नदानाचे कार्य केले. अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून अष्टगंध कला मंचाच्यातर्फे अष्टगंध कला मंचाच्या नाट्य कलावंतांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी गजानन महाराज, रवी पाटील, महादेव घरत, विकास नाईक, गजानन म्हात्रे, रंजन ठाकूर, पंकज पाटील, रोशन ठाकूर, नरेंद्र कडू ,मनोज ठाकूर, माणिक म्हात्रे, रावजी म्हात्रे, गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अष्टगंध कला मंचाने दि. बा. पाटील चळवळ लघुपट स्पर्धेत दि. बा. पाटीलांच्या आंदोलनाची चित्रफित सादर केली.
या लघुपटात धनेश्वर म्हात्रे, चित्रफितीचे दिग्दर्शन करणारे गजानन म्हात्रे, प्रमुख कलाकार धनेश्वर म्हात्रे, हासुराम पाटील, अशोक म्हात्रे, वैशाली मोहिते, चेतन पाटील, प्रसाद कडू, रोशन घरत, नवनीत माळी, एन. के. ठाकूर, प्रज्योत पाटील आदी कलाकारांनी अभिनय सादर केला होता. या कलाकारांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे व्यवस्थापन अशोक म्हात्रे, हासुराम पाटील यांनी केले होते. सूत्रसंचालन नाटककार रंजन ठाकूर यांनी केले.
नाट्य कलाकारांचा गौरव
