भर नागरी वस्तीमध्ये बकरीऱ्यांच्या गोठयाचा त्रास

| पेण | प्रतिनिधी |

पेण येथील मोहल्ल्यात भर वस्तीमध्ये बकरीच्या गोठयाच्या दुर्गंधी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पेण नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. महत्वाची बाब म्हणजे हा गोठा पेण नगरपालिकेतील एका मा.लोकप्रतिनिधीच्या भावाचा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नागरिक देखील तक्रार करायला घाबरत आहेत.

खाटीक मोहल्ल्यात प्रत्यश भेट दिली असता गोठयाच्या बाजुने चालत जाणे कठीण होते. दुर्गंधी एवढया मोठया प्रमाणात आहे, की शेजाराच्या घरांना देखील त्याचा त्रास होत आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या वाटसरुंना नाकाला रुमाल लावल्याशिवाय जात येत नाही. समोर लोखंडी ग्रीलचा दरवाजा असून त्याला हिरव्या रंगाचे मॅट लावले आहे. तसेच, आतील बाजूला बकऱ्या दिसू नयेत म्हणून शर्टर लावण्यात आले आहे. जेणेकरुन सर्वसामान्य नागरिकांना हा गोठा आहे, असे समजू नये. याबाबत पेण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी शिवाजी चव्हाण यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदरील सत्यता काय आहे ती मी पडताळून घेतो. त्यासाठी घटनास्थळी मी माझा कर्मचारी पाठवतो, जर गोठा असेल, तर मालकाविरुध्द तातडीने कारवाई करतो.

Exit mobile version