नगराध्यक्षांसोबत आ. गोगावले यांनी घेतली नगरविकासमंत्र्यांची भेट

| पोलादपूर | प्रतिनिधी |
महाडचे आमदार भरत गोगावले यांनी माणगाव आणि पोलादपूर तसेच खालापूर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष यांच्यासह राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
याप्रसंगी आ. गोगावले यांच्यासोबत कर्जतचे आ. महेंद्र थोरवे, पोलादपूर तालुका प्रमुख निलेश अहिरे, रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे तसेच पोलादपूर नगराध्यक्षा सोनल गायकवाड आणि नगरपंचायतीमधील इतर नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी माणगांव, पोलादपूर आणि खालापूर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी, जनतेने टाकलेला विश्‍वास विकास कामांच्या रुपाने सार्थकी लावा. यासाठी लागेल तेवढा विकास कामांसाठीचा निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासन दिले.

Exit mobile version