‘गोगटे’ला बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद

| मुंबई | प्रतिनिधी |

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) पुरुष व महिला बुद्धिबळ संघाने मुंबई विद्यापीठ कोकण झोन पुरुष व महिला बुद्धिबळ सांघिक स्पर्धेचे विजेतपद पटकावले. मुंबई विद्यापीठ, मुंबई व कोकण झोन आणि शिक्षण विकास मंडळाचे एस. एच. केळकर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय (देवगड) यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण झोन पुरुष आणि महिला बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुष संघात ऋग्वेद सरजोशी, मानस सिदये, अनुज पुजारी, अथर्व देसाई, वेदांत सावर्डेकर, यश गोगटे आणि महिला संघात जिज्ञासा सावंत, अस्मिता खानविलकर, श्रेया परूळेकर, प्राची वळंजू, हिमानी फाटक, ग्येयता काळे या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.

Exit mobile version