। म्हसळा । वार्ताहर ।
वसंतराव नाईक कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि बॅ.ए.आर. अंतूले विज्ञान महाविद्यालय यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गोखले कॉलेज श्रीवर्धनच्या संघाने प्रथम क्रमांक तर पाली येथील कॉलेजने दुसरा क्रमांक पटकाविला. या कबड्डी स्पर्धाचा बक्षिस वितरण समारंभ मुशताक अंतूले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी आर. सी. घरत, निजाम कागदी, फझल हलडे, शकूर घनसार, मुसद्दीक इनामदार, फव्वाद अराई, महादेव पाटील, नीलम वेटकोळी, प्रा. दिगंबर टेकळे आदि मान्यवर उपस्थित होते.
कबड्डी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी फझल हलडे, सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. दिगंबर टेकळे यांच्या माध्यमातून स्पर्धा समन्वयक सुमित चव्हाण, क्रीडा समिती अध्यक्ष प्रा. संजय बेंद्रे, प्रा. कानिफ भोसले आणि सर्व सहकार्यानी सहकार्य केले.