कबड्डी स्पर्धेत गोकुळवाडा विजयी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

श्री जन्नी माता ढेबेवाडी यांच्यावतीने धनगर समाजाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. 23 रोजी ढेबेवाडी-खालापूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम लढत गोकुळवाडा विरुद्ध सोनारशेत या संघांमध्ये झाली. या लढतीत काळभैरव गोकुळवाडा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.

या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत 16 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेतील अंतिम लढत गोकुळवाडा विरुद्ध सोनारशेत या संघांत झाली. या लढतीत काळभैरव गोकुळवाडा हा प्रथम क्रमांकाच मानकरी ठरला. या संघास रोख रक्कम 7 हजार व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांक सोनारशेत या संघास रोख रक्कम 5 हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी विरणी पेण, तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी गौळवीर गौळमाळ या दोन्ही संघांना प्रत्येकी 3 हजार व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू महेश खरात (गोकुळवाडा), उत्कृष्ट चढाई भावेश झोरे (गोकुळवाडा), तर उत्कृष्ट पक्कड बाबू कोकरे (सोनारशेत) खेळाडूंना मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version