85 मीटरचा सर्वोत्तम भालाफेक
। फिनलंड । वृत्तसंस्था ।
येत्या जुलैमध्ये होणार्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. या स्टार भालाफेकपटूने पावो नुर्मी गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले.
फिनलंडमधील तुर्कू येथे झालेल्या या सामन्यात नीरजने तिसर्या प्रयत्नात 85.97 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. यासह त्याने ऑलिम्पिकपूर्वी आपण फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले आहेत. या स्पर्धेत फिनलंडचा टोनी केरानेन दुसर्या क्रमांकावर राहिला. त्याने 84.19 मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले. फिनलंडच्या ऑलिव्हर हेनलँडरने 83.96 मीटर भालाफेक करून कांस्यपदक जिंकले.
नीरज चोप्राने सुरुवातीला चांगली सुरुवात केल्यानंतर मागे पडला होता. त्याने पहिल्या प्रयत्नात 83.62 मीटर भालाफेक केला. यानंतर दुसर्या प्रयत्नात तो केवळ 83.45 मीटरच भालाफेक करू शकला. इथपर्यंत तो ऑलिव्हर हेनलँडरपेक्षा मागे होता. ऑलिव्हरने दुसर्या प्रयत्नात 83.96 मीटर भालाफेक केला होता. त्यानंतर तिसर्या प्रयत्नात नीरज त्याच्या पुढे गेला, जो त्याचा सर्वोत्तम भालाफेक ठरला. 8 खेळाडूंपैकी नीरज एकमेक खेळाडू होता, ज्याने 85 मीटरचा टप्पा पार केला.
तिसर्या भालाफेक नंतर नीरजचे उरलेले भालाफेक खूपच कमकुवत होते. चौथ्या प्रयत्नात तो केवळ 82.21 मीटर भालाफेक करू शकला. नीरजचा पाचवा प्रयत्न फाऊल झाला. त्यानंतर सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्याने 82.97 मीटर भालाफेक केला.
नीरजचे सहा प्रयत्न पहिला प्रयत्न: 83.62 मीटर दुसरा प्रयत्न: 83.45 मीटर तिसरा प्रयत्न: 85.97 मीटर चौथा प्रयत्न: 82.21 मीटर पाचवा प्रयत्न: फाऊल सहावा प्रयत्न: 82.97 मीटर
सर्व भालाफेकपटूंचे सर्वोत्तम थ्रो नीरज चोप्रा (भारत) 88.36 मीटर टोनी केरानेन (फिनलंड) 84.19 मीटर ऑलिव्हर हेलँडर (फिनलंड) 83.96 मीटर अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) 82.58 मीटर एंड्रियन मार्डारे (मोल्दोव्हा) 82.19 मीटर केशोर्न वॉलकॉट (त्रिनिदाद) 81.93 मीटर मॅक्स डेहनिंग (जर्मनी) 79.84 मीटर