महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

। पनवेल। वार्ताहर ।

बसमध्ये चढत असताना महिलेची सोनसाखळी चोरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कौसा खुटारकर या नावडे येथे राहत असून, करंजाडे येथे गणपती दर्शनसाठी आल्या होत्या. सायंकाळी घरी जाण्यासाठी पनवेल बस स्थानकात एनएमएमटी बसची वाट पाहत उभ्या होत्या. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत, त्यांची दोन तोळ्याची सोन्याची चेन चोरण्यात आली.

Exit mobile version