सोन्याची चेन पळवणारा गजाआड

| पनवेल | प्रतिनिधी |

करंजाडे येथील एका महिलेच्या ओळखीचा तरूण चेतन अरुण पिंगळे (23) याने त्यांच्या घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन कटरच्या सहाय्याने कापली. त्यावेळी त्या महिलेने चेतला आडविण्याचा प्रयत्न केला असताना त्याने त्यांना धक्का मारुन खाली पाडले. त्यात त्या महिलेच्या गुडघ्याला दुखापत झाली असून, तरूणाने ती चेन हिसकावली आणि “कोणाला सांगितले तर लक्षात ठेव मारुन टाकील”, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित महिलेच्या दाराला बाहेरून कडी लावून त्याने तेथून पळ काढला. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि हजरतअली पठाण, पोउपनि विनोद लभडे, पोहवा परेश म्हात्रे, पोहवा महेंद्र वायकर, पोहवा योगेश दिवेकर, पोना सम्राट डाकी, पोशि शशिकांत काकडे आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेऊन चेतन पिंगळेला गजाआड केले.

Exit mobile version