| नेरळ | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टींग असोसिएशनच्यावतीने राज्यस्तरीय सिनियर आणि मास्टर्स पॉवर लिफ्टींग स्पर्धेत कर्जत तालुक्यातील अमृता ज्ञानेश्वर भगत हिने 47 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. जगातील पॉवर लिफ्टींग स्पर्धेची अमृता ही उपविजेती आहे.
राज्य पॉवर लिफ्टींग असोसिएशनच्यावतीने कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय येथे राज्यस्तरीय मास्टर्स आणि सिनियर पॉवर लिफ्टींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुरुष आणि महिला अशा दोन गटात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत कर्जत तालुक्यातील शेलू गावातील रहिवाशी असलेली अमृता ज्ञानेश्वर भगत हिने 47 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. जागतिक पॉवर लिफ्टींग स्पर्धेत उपविजेती ठरलेली अमृता ही या स्पर्धेचे आकर्षण होती. त्यानुसार तिने देखील आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूप्रमाणे कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.