| म्हसळा | वार्ताहर |
अविनाश मोरे, प्रसाद विचारे, रुपेश मुरकर, कृतार्थ कोलथरकर आणि अनिकेत साखरे यांच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन कराटे क्लब रायगड आयोजित शिवछत्रपती चषक राज्यस्तरीय कराटे स्पर्धा नुकत्याच श्रीवर्धन येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत इंड कुमाटे स्पर्धेत अविनाश गुरु पवार या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकावले. या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 29 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
अविनाशची घरची परिस्थिती हलाखीची असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याची आई मोलमजुरी करते. त्याचप्रमाणे मुलांना शिक्षण देऊन त्यांना घडविते. अविनाशने आपल्या आइर्हच्या मेहनतीचे चीज केले असून, त्याने इंड काटा कराटे अंतर्गत इंड कुमाटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून सर्वांनाच आश्चर्यचा धक्का दिला. मोलमजुरी करून आपल्या दोन मुली आणी मुलगा यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवल्याने अनिता पवार हिचे तालुक्यातून खूप कौतुक होत आहे.
या स्पर्धामध्ये तालुक्यातील वंश करंबे, रिचा जैन, विहान लटके, हिंदवी निजामपूरकर, शर्वरी कोद्रे, जैनी जैन, भूमी देवे, श्रावणी नांदगावकर, स्वरा हेंगीष्टे, आर्या करडे, स्वराज उद्धरकर, अभिजित कलमकर, आदित्य कलमकर, सोहेल तांबे, निर्जा धोत्रे, निर्मयी करडे इत्यादी स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्तम कामगिरी दाखविली. तालुक्यातून सर्व यशस्वी स्पर्धकांना शुभेच्छा देण्यात आल्या. म्हसळ्यातील एकूण 29 स्पर्धकांनी 12 सुवर्ण, 11 रौप्य आणि 29 कांस्यपदकांची कमाई केली.