उरण | वार्ताहर |
हैदराबाद येथे इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत साईराज जगदीश भोईर या नवीन शेवेयेथील उदयमुख खेळाडूने फर्स्ट रँक 120 प्लस कॅट्यागिरी मध्ये एकूण 628 किलो वजन उचलून गोल्ड मेडल मिळविले आहे. तसेच गेल्या महिन्यात साईराज भोईर यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविले होते. त्याच्या उत्तम कामगिबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कु साईराज यास पुढील वाटचालीस शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले.यावेळी जगदीश भोईर, उरण गणेश म्हात्रे, उपतालुका संघटक अमित भगत व भुपेंद्र भोईर उपस्थित होते